चाळीसगाव तालुक्यातील पिराचे बोरखेडा येथील धरणात पोहायला गेलेल्या चाळीसगाव शहरातील पाच तरुणांपैकी एका तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने इतर चौघे तरुण पोहत बाहेर आल्याने बचावले. ऐन ईदच्या दिवशी ही दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुण वैद्यकीय शिक्षण घेत होता.
https://prahaar.in/2026/05/28/shocking-incident-in-ajmer-four-people-including-former-sarpanch-burnt-alive-in-scorpio-accident-fake-exposed/
मोईन जाकीर झारेकरी (वय २०, रा. हॉटेल सदानंद समोर, चाळीसगाव), शेख मुनीब मोहम्मद सलीम (20, सडक गल्ली, चाळीसगाव), रेहान सय्यद (२०, रथ गल्ली, चाळीसगाव), अल्तमाश शेख (२४, प्लॉट एरिया, चाळीसगाव) आणि जायद शेख (हॉटेल सदानंद समोर, चाळीसगाव) हे पाच तरुण गूरूवारी (दि.२८) रोजी दुपारी तालुक्यातील बोरखेडा येथील धरणात पोहण्यासाठी गेले होते.पोहत असताना मोईन जाकीर झारेकरी याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या चौघा मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळून आला नाही.घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी बोरखेडा येथे धाव घेतली. नगरसेवक अनिल ठाकरे, संभाअप्पा जाधव, फकिरा मिर्झा, बाबा ठेकेदार, मुकेश चौधरी, उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, रोशन जाधव यांच्यासह समाजबांधवांनीही घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.
https://prahaar.in/2026/05/28/local-self-government-legislative-council-elections-2026-bjps-candidate-from-amaravati-is-praveen-pote/
तब्बल दोन ते तीन तास शोधमोहीम राबविल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोईनचा मृतदेह धरणातील गाळात अडकलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर मोईनच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मोईन हा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. तो मालेगाव येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. बकरी ईदनिमित्त तो घरी आला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.