नवी दिल्ली :
फुटबॉल विश्वचषक अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असताना लिओनेल मेस्सी यांच्या दुखापतीबाबत फुटबॉल चाहत्यांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी मेस्सीची स्थिती “फार गंभीर नाही” असे सांगत आशावाद व्यक्त केला. इंटर मियामीकडून खेळताना फिलाडेल्फियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला डाव्या मांडीच्या स्नायूंमध्ये थकवा जाणवला. त्यामुळे सामन्याच्या ७३व्या मिनिटाला त्याने मैदान सोडले होते.स्कालोनी यांनी सांगितले की, “मेस्सीला काहीही झाले नसते तर अधिक चांगले झाले असते. मात्र प्राथमिक अहवाल फार चिंताजनक नाही.
https://prahaar.in/2026/05/28/considering-the-interest-of-the-citizens-in-this-difficult-economic-situation-the-state-government-should-immediately-decide-to-abolish-vat-and-surcharge-on-petrol-and-diesel/
पुढील वैद्यकीय तपासणीनंतर खरी स्थिती स्पष्ट होईल.” ३८ वर्षीय मेस्सी अजूनही अर्जेंटिनाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. कतारमध्ये चार वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजेतेपदाचे संरक्षण करण्यासाठी अर्जेंटिना सज्ज होत आहे.
https://prahaar.in/2026/05/28/the-game-was-decided-in-the-first-over-hyderabad-lost-in-the-eliminator-due-to-cummins-mistake-ipl-2026/