Home क्रीडा Lionel Messi Statue : वाऱ्याच्या झोतामुळे मेस्सीचा पुतळा डगमगला !

Lionel Messi Statue : वाऱ्याच्या झोतामुळे मेस्सीचा पुतळा डगमगला !

Lionel Messi Statue : वाऱ्याच्या झोतामुळे मेस्सीचा पुतळा डगमगला !
Lionel Messi Statue

सुरक्षेसाठी प्रशासनाचा पुतळा हटवण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी याच्या भारत भेटीनिमित्त उभारण्यात आलेला पुतळा आता धोकादायक ठरत असल्याने तो हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात उभारलेला हा २१ मीटर उंच सुवर्णरंगी पुतळा वाऱ्यामुळे डळमळीत होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/05/28/considering-the-interest-of-the-citizens-in-this-difficult-economic-situation-the-state-government-should-immediately-decide-to-abolish-vat-and-surcharge-on-petrol-and-diesel/

अर्जेंटिना आणि इंटर मियामी संघाचा तारा खेळाडू मेस्सी विश्वचषक करंडक उंचावत असल्याचे या पुतळ्यात दाखवण्यात आले होते. डिसेंबरमध्ये झालेल्या मेस्सीच्या भारत दौऱ्यानिमित्त हा पुतळा उभारण्यात आला होता.

https://prahaar.in/2026/05/28/after-pimpleshwar-bjps-mission-malanggad-durgadi-deepesh-mhatres-warning/

पश्चिम बंगालचे आमदार शरद्वत मुखर्जी यांनी सांगितले की, “राज्य शासनाच्या अभियंत्यांनी तपासणी केल्यानंतर हा पुतळा सुरक्षित नसल्याचे आढळून आले आहे. जोरदार वाऱ्यामुळे तो हलताना
दिसत आहे.” बुधवारी कामगारांनी दोरांच्या सहाय्याने पुतळा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. हा पुतळा शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर उभारण्यात आला असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पुतळा नेमका कधी हटवला जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी प्रशासनाने शक्य तितक्या लवकर तो हटवण्याची तयारी सुरू केली आहे. हा पुतळा अन्य ठिकाणी पुन्हा उभारला जाणार का, याबाबतही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

https://prahaar.in/2026/05/28/mangalwedha-marathi-reel-star-rohini-paradhye-ends-life-hotel-gram-panchayat-solapur/