Shiv Thakare Home Tour: फराह खानने बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालक म्हणूनही काम करताना दिसते. सध्या ती तिच्या यूट्यूबवरील ब्लॉगमुळे देखील लोकप्रिय आहे.
कूक दिलीपबरोबर फराह खान अनेक कलाकारांच्या घरी जाते. या निमित्ताने फराहबरोबर लोकप्रिय कलाकारांची घरे, त्याचे इंटिरिअर, घरातील खास वस्तू, पेंटिंग पाहायला मिळते. आपले आवडते कलाकार कशा पद्धतीचे आयुष्य जगतात. त्यांच्या घरात काय-काय आहे हे चाहत्यांना पाहता येते. याबरोबरच, कलाकार फराहसाठी काही खास पदार्थ बनवतात. काही पदार्थ सगळे मिळून बनवतात, तेही या ब्लॉगमध्ये पाहायला मिळते.
https://prahaar.in/2026/05/26/worlds-first-doping-friendly-competition-drugs-steroids-allowed-creates-excitement-in-the-sports-world/
आता फराह खान नुकतीच कुक दिलीपसह शिव ठाकरेच्या घरी गेली होती, त्याचा व्हिडीओ फराहने यूट्यूबवर शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या घराची झलक पाहायला मिळाली. शिवच्या घरात प्रवेश करताच लाकडी तपकिरी दरवाजा दिसतो. घराच्या इंटिरियरमध्ये साधेपणा आणि आरामाला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. त्याच्या घरात चांगला प्रकाश येतो. तसेच, घराला दिलेला रंग आणि फर्निचर यामुळे घर आकर्षक वाटते.
https://prahaar.in/2026/05/26/forest-minister-ganesh-naik-ai-alert-system-in-1000-villages-to-prevent-human-wildlife-conflict/
घराच्या हॉलमधील सोफा लक्ष वेधून घेतो. तसेच, मोठा टीव्ही भिंतीवर लावलेला आहे. छोट्या मेटॅलिक शोपीसेस आणि घरातील झाडांचा वापर करत घराची सजावट केली आहे. तसेच, एकीकडे त्याने जिंकलेले पुरस्कार ठेवले आहेत. त्यातून त्याच्या टेलिव्हिजनच्या प्रवासाची झलक पाहायला मिळते.
शिवच्या किचनमध्ये कमी जागेत जास्तीत जास्त उपयोग होईल यावर भर देण्यात आला आहे. किचनमध्ये टॉप-ग्रे रंगाचे कॅबिनेट्स आहेत. रंगामुळे किचन अधिक प्रशस्त वाटते, तसेच जास्त प्रकाश वाटतो. सजावटीपेक्षा रोज किचन वापरताना किंवा तिथे काम करताना ते सोयीचे व्हावे यावर भर दिल्याचे पाहायला मिळते.
https://prahaar.in/2026/05/26/special-incentives-for-5-projects-worth-rs-89000-crore-chief-minister-devendra-fadnavis/
शिव ठाकरेच्या कामाबद्दल बोलायचे तर त्याने रिअॅलिटी शोमधून त्याची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एम टीव्हीवरील ‘रोडिज रायसिंग’ या शोमध्ये तो सहभागी झाला होता. त्यावेळी तो मोठ्या चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. या पर्वाचा तो विजेता ठरला. त्याचा खेळ, त्याची मैत्री या सगळ्याचीच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यानंतर बिग बॉस १६ मध्येही तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. यामध्ये तो उपविजेता ठरला. याबरोबरच, २०२३ मध्ये ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या पर्वात तो सहभागी झाला होता. तसेच, तो ‘द ५० इंडिया’च्या पहिल्या सीझनच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला. आता आगामी काळात तो कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.