Tuesday, May 26, 2026

Riteish Deshmukh Film Raja Shivaji : राजा शिवाजी सिनेमाची ऐतिहासिक कामगिरी, फक्त २५ दिवसांत ५ मोठे विक्रम

Riteish Deshmukh Film Raja Shivaji : राजा शिवाजी सिनेमाची ऐतिहासिक कामगिरी, फक्त २५ दिवसांत ५ मोठे विक्रम

मुंबई : अभिनेता दिग्दर्शक रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या चित्रपटाने ऐतिहासिक कामगिरी केली. हा चित्रपट महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाला. अवघ्या २५ दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला. प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत या चित्रपटाने अनेक विक्रम केले. चला थोडक्यात जाणून घेऊन राजा शिवाजी या चित्रपटाने केलेले पाच प्रमुख विक्रम...

"> " class="section-post-content-internal-post-title">Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी जीविताचे ...

राजा शिवाजी हा मूळ चित्रपट मराठी भाषेत तयार झाला. नंतर हा चित्रपट हिंदी भाषेत डब करण्यात आला. महाराष्ट्र दिनी एकाचवेळी मराठी आणि हिंदी अशा दोन भारतीय भाषांमध्ये अभिनेता दिग्दर्शक रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया डिसुझा देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन यांची प्रमुख भूमिका आहे. सलमान खानचीही एक छोटी भूमिका आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून सतत उत्तम कामगिरी केली. अगदी महाराष्ट्र दिनापासूनच हा चित्रपट त्याच्या वाढत्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे सतत चर्चेत राहिला. भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडणारा राजा शिवाजी हा पहिला मराठी चित्रपट आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करून या चित्रपटाने नवा अध्याय लिहिला आहे.

"> " class="section-post-content-internal-post-title">Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी जीविताचे ...

राजा शिवाजी या मराठी चित्रपटाने केलेले पाच प्रमुख विक्रम

  1. भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडणारा राजा शिवाजी हा पहिला मराठी चित्रपट
  2. राजा शिवाजी चित्रपटाने सैराट या मराठी चित्रपटाच्या ऐतिहासिक कामगिरीलाही टाकले मागे. सैराटने २५ दिवसांत ९० कोटींची तर राजा शिवाजी चित्रपटाने २५ दिवसांत १०० कोटींची कमाई केली .
  3. राजा शिवाजी चित्रपटाने भारतात १०१ कोटींपेक्षा जास्त तर पूर्ण जगात एकूण ११४ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
  4. रितेश देशमुखच्या यशस्वी कारकिर्दीतील दहावा आणि १०० कोटींची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट
  5. राजा शिवाजी चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.७ कोटींची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक ओपनिंगच्या यादीत अव्वल स्थान पटकावले
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >