नाशिक: नाशिकमध्ये पुन्हा एकदा प्लॉट माफियांचे काळे रॅकेट समोर आले असून जळगावच्या एका व्यावसायिकाला तब्बल २२ लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. स्वस्तात प्लॉट देण्याचे आमिष दाखवत बनावट मालक उभा करणे, खोटे दस्तऐवज तयार करणे आणि विश्वास संपादन करून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार समोर आल्याने शहरातील जमीन व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Nashik : नाशिकमधील पंचवटी परिसरात एका मद्यधुंद कार चालकाचा थरार पहायला मिळाला आहे. टाळकुटेश्वर मंदिराच्या अलीकडे असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात या ...
या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजरला सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी न्यायालयात हजर केले असता बडगुजरला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकारामुळे प्लॉट माफियांचे रॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे
भालचंद्र यशवंत चौधरी (वय ५५, रा. एम.जे. कॉलेजजवळ, जळगाव) यांनी गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीनुसार, आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजर, रतन ससाणे आणि इतर साथीदारांनी संगनमत करून नाशिक येथील गंगापूर शिवारातील प्लॉट विक्रीच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा केला.
Nashik Crime News: नाशिकचे भोंदू अशोक खरात प्रकरण हे देशभर चर्चेत आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक अशा विविध ...
फिर्यादीला ओळखीचा आणि खात्रीशीर प्लॉट असल्याचे सांगून आरोपींनी वारंवार बैठका घेत विश्वास संपादन केला. आज घेतला नाही तर दुसरा ग्राहक तयार आहे असा दबाव टाकत लाखो रुपये रोख, बँक ट्रान्सफर आणि चेकद्वारे उकळले. आरोपींनी प्लॉटचे बनावट दस्तऐवज, खोटे मालक आणि बोगस व्यवहार दाखवत तब्बल २२ लाख ५७ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.






