मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीत इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला यांच्यात १० दिवसांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ही महत्त्वाची घोषणा करत दोन्ही देशांच्या नेतृत्वाने याला सहमती दर्शवल्याची माहिती दिली.
ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन (Joseph Aoun) आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही देशांनी ठराविक वेळेनुसार औपचारिक युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला.
https://prahaar.in/2026/04/16/terrorist-amir-hamza-mastermind-behind-several-terror-attacks-in-india-shot-condition-critical/
दरम्यान, लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष औन यांनी ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत पश्चिम आशियातील शांततेसाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. दुसरीकडे, नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळात स्पष्ट केले की, अमेरिकेच्या विनंतीनुसार हा निर्णय घेतला असला तरी सुरक्षा दलांची तैनाती कायम ठेवली जाईल.
https://prahaar.in/2026/04/15/pakistans-inefficient-healthcare-system-331-children-were-given-aids-injections-with-a-single-needle-many-died/
अमेरिका – इराण युद्धात १० दिवसांचा युद्धविराम लागू; बेरुतमध्ये जल्लोष
.
.#prahaarnewsline #marathinews #americairanwar #ceasefire #celebration pic.twitter.com/Yn4o7NhyCx— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) April 17, 2026
लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलामा यांनी या निर्णयाचे स्वागत करत देशातील नागरिकांचे अभिनंदन केले. तसेच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) यांनीही या युद्धविरामाचे स्वागत करत शांततेसाठी हा सकारात्मक टप्पा असल्याचे म्हटले आहे.