पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ताउंसा शहरातून एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तब्बल ३३१ मुलांना एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले असून, या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एका अहवालानुसार, ताउंसा येथील सरकारी टीएचक्यू रुग्णालयात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयात एकाच सिरिंजचा पुन्हा पुन्हा वापर केला जात असल्याचे समोर आले असून, अनेक मुलांना एकाच औषधाच्या बाटलीतून इंजेक्शन देण्यात आले. यामुळे संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला.
https://prahaar.in/2026/04/15/sahar-shaikh-mumbra-aimim-complaint-filed-alleging-that-mim-corporator-sahar-shaikh-obtained-a-fake-caste-certificate/
तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तब्बल ६६ वेळा निर्जंतुकीकरण न केलेल्या हातमोज्यांशिवाय इंजेक्शन दिल्याचे आढळले. तसेच एका परिचारिकेला वैद्यकीय कचऱ्यात हातमोज्यांशिवाय हात घालताना पाहिले गेले.
https://prahaar.in/2026/04/15/pm-modi-karnataka-visit-pm-narendra-modis-holy-visit-to-adichunchanagiri-had-darshan-at-shri-guru-bhairavakona-temple/
या घटनेमुळे पाकिस्तानातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.