Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIPL 2024राजस्थानची पंजाबवर बाजी

राजस्थानची पंजाबवर बाजी

यशस्वी, पडीक्कल, हेटमायर चमकले

धर्मशाला (वृत्तसंस्था) : यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडीक्कल आणि शिमरॉन हेटमायर यांच्या दमदार खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जला ४ विकेट राखून पराभूत केले. विजयामुळे राजस्थानने पाचव्या स्थानी झेप घेतली.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने चाहत्यांना पुरते निराश केले. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडीक्कल यांनी राजस्थानचा डाव सावरला. यशस्वीने ५०, तर पडिक्कलने ५१ धावा फटकवल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर राजस्थानचा संघ पुन्हा संकटात आला. शिमरॉन हेटमायरने फलंदाजीची सूत्रे हाती घेत राजस्थानला विजयाच्या जवळ आणून ठेवले. हेटमायरने ४६ धावा चोपल्या. ध्रुव जुरेलने ट्रेट बोल्टच्या साथीने निर्णायक फटकेबाजी करून राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थानने ४ विकेट आणि २ चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठले. पंजाबच्या प्रत्येक गोलंदाजाने विकेट मिळवली. परंतु धावा रोखण्यात ते सपशेल अपयशी ठरले. कगिसो रबाडाने सर्वाधिक २ विकेट मिळवल्या.

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने निर्धारित २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १८७ धावा केल्या. सुरुवात अडखळत झाली असली तरी सॅम करन, जितेश शर्मा आणि एम शाहरूख खान यांनी फटकेबाजी करत पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. करनने नाबाद ४९ धावा केल्या. जितेश शर्माने ४४ धावांची भर घातली. एम शाहरूख खानने नाबाद ४१ धावा फटकवल्या. शेवटच्या षटकांत पंजाबने तुफान फलंदाजी केली. पंजाबने आपल्या डावाच्या शेवटच्या दोन षटकांत ४६ धावा कुटल्या. त्यामुळे सुरुवातीला संथ झालेली फलंदाजी नंतर मात्र आक्रमक झाली. त्यामुळे पंजाबच्या धावांचा वेग चांगलाच वाढला. राजस्थान रॉयल्सच्या संदीप सैनीने ४ षटकांत ३ बळी मिळवले. परंतु त्याला धावा रोखण्यात यश आले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -