Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीराजापूर तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त

राजापूर तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त

राजापूर :एकीकडे राज्यात ओमायक्रॉन रूग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली असताना राजापूर तालुकावासीयांसाठी दिलासादायक वातावरण आहे. तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा शून्यावर आल्याने राजापूर तालुका आता पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आता राजापूर तालुकावासीयांना दिलासा मिळाला असून भविष्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाही वा ओमायक्रॉनचा फैलाव होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारीही वाढली आहे.

यापूर्वी पहिल्या लाटेत दोन वेळा आणि त्यानंतर दुसऱ्या लाटेतही एक वेळा राजापूर तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा शून्यावर येऊन तालुका कोरोनामुक्त झाला होता. मात्र पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने हा आकडा वाढला होता. मात्र दुसऱ्या लाटेत पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तालुक्यातील ओणी, रायपाटण येथील कोविड रुग्णालये व धारतळे, हातिवले व रायपाटण येथील कोविड केअर सेंटरही बंद करण्यात आलेले आहेत.

गेल्या आठवडाभरात तालुक्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आलेला नाही. जो एक कोरोनाबाधित रूग्ण होता व ज्याच्यावर उपचार सुरू होते, तो शनिवारी पूर्णपणे बरा झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता शून्य झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि जनतेला देखील दिलासा मिळाला आहे.

तालुक्यात आजपर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकूण ५ हजार १८८ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यातील ४ हजार ९८४ रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजपर्यंत तालुक्यात २०४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या एकही रूग्ण तालुक्यात अॅक्टीव्ह नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या शून्य इतकी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -