Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi in Pune: पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल... पुणेकरांचा आनंद गगनात...

PM Narendra Modi in Pune: पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल… पुणेकरांचा आनंद गगनात मावेना!

चिमुकली मुले हातात ‘वेलकम टू पुणे’चे बोर्ड घेऊन पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्ज

पुणे : टिळक स्मारक ट्रस्टकडून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदींसह शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाकरता दोन्ही नेते पुण्यात दाखल झाले असून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पुण्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुणे विमानतळावर पंतप्रधान दाखल होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचे स्वागत केले.

पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी चिमुकली मुले हातात ‘वेलकम टू पुणे’चे बोर्ड घेऊन उभी होती. माध्यमांशी बोलताना एका चिमुकल्याने तर ‘मी ९ वाजल्यापासून त्यांच्या येण्याची वाट पाहतोय’ असे म्हटले. पुणेकर अत्यंत उत्साही झाले असून ते सकाळपासूनच रस्त्याच्या दुतर्फा पंतप्रधान मोदींची वाट पाहत आहेत. एका महिलेने ‘मोदीजी आमच्या घराच्या अत्यंत जवळ येत असल्याने हा आमच्यासाठी दिवाळीचा दिवस आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. ‘आम्हाला कधीपासून मोदींना भेटायचं होतं’, ‘प्रचंड आनंद झाला आहे’, ‘देशाच्या पंतप्रधानांना प्रत्यक्ष पाहून डोळे भरुन आले’, अशा प्रतिक्रिया पुणेकरांनी दिल्या. तर काहीजण केवळ मोदींची एक झलक पाहण्यासाठी थेट मीरा रोडहून आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. तिथे त्यांच्या हस्ते गणपतीची आरती केली जाणार आहे. त्यानंतर ते पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना होणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -