Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणसिंधुदुर्गात शांततेत मतदान; कडेकोट पोलीस बंदोबस्त

सिंधुदुर्गात शांततेत मतदान; कडेकोट पोलीस बंदोबस्त

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार नगर पंचायतीसाठी सकाळपासून शांततेत सुरुवात झाली आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे ३० ते ३५ टक्के मतदान झाले होते.

जिल्ह्यात कुडाळ, कसई-दोडामार्ग, देवगड-जामसंडे आणि वाभवे-वैभववाडी या नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. प्रत्येक नगर पंचायतीच्या १३ अशा एकूण ५२ जागांसाठी १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत बहुतेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले आहेत.

दरम्यान जिल्ह्यात निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्ह्यातील १३० ग्राम पंचायतींच्या पोट निवडणुकांपैकी केवळ १४ ग्राम पंचायतीसाठी आज शांततेत मतदान होत आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्याने तब्बल ७५ ग्राम पंचायतीत अर्ज आलेले नाहीत तर ४१ ग्रामपंचायतीमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -