Sunday, May 12, 2024
Homeक्रीडाआशिया चषकाआधी पाकिस्तानला मिळाली गुडन्यूज

आशिया चषकाआधी पाकिस्तानला मिळाली गुडन्यूज

आशिया कपआधी पाकिस्तानची धमाल, एकदिवसीय क्रमवारीत अव्वल, टीम इंडिया कुठे?

कोलंबो : पाकिस्तानने ३ सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामन्यात अफगाणिस्तानला ५९ धावांनी हरवत मालिका ३-० अशी आपल्या नावे केली. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या समोर अफगाणिस्तानचा संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत जबरदस्त यश मिळवल्याने त्याचा फायदा पाकिस्तानच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मिळाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा वनडे संघ या क्रमवारीत अव्वल ठरला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियालाही मागे टाकले. भारतीय संघ ११३ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

आशिया कपआधी पाकिस्तानला मिळालेले हे मोठे यश आहे. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळाल्याने पाकिस्तानचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. पाकिस्तानने या वर्षात ११ एकदिवसीय सामने खेळलेत. यापैकी ८ सामन्यांत त्यांना विजय मिळाला आहे. त्यांनी मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची मालिका १-२ अशी गमावली होती. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंडला ४-१ अशी मात दिली. टी-२० क्रमवारीत पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे तर कसोटी क्रमवारीत पाकिस्तान सहाव्या स्थानी आहे.

पाकिस्तान अव्वल

अफगाणिस्तानविरुद्ध मालिका विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा संघ ११८.४८ रेटिंग गुणासह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ ११८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी पाकिस्तानचा संघ ११५.८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर होता तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -