Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीCyber crime: ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मागविला कॅमेरा मिळाला साबण!

Cyber crime: ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मागविला कॅमेरा मिळाला साबण!

पनवेल (प्रतिनिधी) : अमेझॉनवर ६० हजार रुपये किमतीचा कॅमेरा मागविला असता तो न येता साबण, बॅटरी चार्जर व इतर वस्तू आल्याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत लेंडवे हे सेक्टर ३, कळंबोली येथे राहत असून, त्यांनी अ‍ॅमेझॉन अ‍ॅपवरून ‘कॅनोन एम फिफ्टी मार्क टू’ या कंपनीचा कॅमेरा ऑनलाइन हप्त्यावर खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करून ऑर्डर दिली. ५९ हजार ९९० रुपयांचा कॅमेरा दहा जुलैला डिलिव्हरी होणार असल्याचे दिसले. त्यांना अॅमेझॉन कंपनीच्या फोनवरून एकाचा फोन आला व डिलिव्हरीसाठी आला असल्याचे सांगितले. संध्याकाळी कामावरून घरी आले व चव्हाण यांच्याकडून ऑर्डरचा बॉक्स ताब्यात घेतला. त्यांनी डिलिव्हरी बॉक्स खोलत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बॉक्स खोलला. यावेळी त्यात साबण, कॅनन कंपनीची बॅटरी चार्जर, चार्जर केबल, मॅन्युअल बुक अशा वस्तू होत्या. त्यांनी अॅमेझॉनच्या ग्राहक केंद्राच्या फोनवर फोन करून तक्रार दाखल केली. मात्र तपासणी करून ऑर्डर परत मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारीचे निवारण न झाल्याने तसेच फसवणूक झाल्याने लवंडे यांनी कळंबोली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -