Friday, May 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअरेरे.. भाषा बदलली! मतांसाठी उद्धव ठाकरे राहुल गांधींना शरण

अरेरे.. भाषा बदलली! मतांसाठी उद्धव ठाकरे राहुल गांधींना शरण

मतांसाठी लाचारी पत्करुन काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व खुंटीला टांगले

मुंबई : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) समारोप कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात नेहमीप्रमाणे, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो… अशी न करता काल भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी व्यासपीठावरील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, “जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो…” अशी हाक देत भाषणाला सुरुवात केली. केवळ मतांसाठी लाचारी पत्करुन काँग्रेसच्या दावणीला बांधल्या गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व या शब्दालाच बगल दिल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule ) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे भाषणाची सुरूवात हिंदू बांधव असे म्हणत करायचे. त्यांनी ते भाषण काल बदलले. उद्धव ठाकरे मतांसाठी राहुल गांधींना शरण गेले आहेत. काल ५० टक्के खुर्च्या सोडून लोक निघून गेले. राहुल गांधी यांचे भाषण लोकांना कळलेच नाही. राहुल गांधींचे भाषण म्हणजे हास्यजत्रा आहे. कालची सभा ही हास्यजत्रा होती. आम्हाला कोणाला संपवायची गरज नाही, जनता आमच्या सोबत आहे.

त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावर हसू येत आहे. कुठे नरेंद्र मोदी आणि कुठे तुम्ही. मोदींचा फोटो लावून तुमचे १८ खासदार निवडून आले. तुम्हाला १८ खासदार निवडून आणण्याचे चॅलेंज आहे. असे म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंना त्यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देत जोरदार टोला लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -