Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedNitin Gadkari : सरकार हे विषकन्येसारखं; जिथे त्याची मदत मिळेल तो प्रयोग...

Nitin Gadkari : सरकार हे विषकन्येसारखं; जिथे त्याची मदत मिळेल तो प्रयोग बंद पडतो!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं का म्हणाले?

भंडारा : ‘हायवेमॅन’ (Highwayman) म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भंडारा ते पवनी हा रस्ता निधी मंजूर झालेला असताना केवळ वनविभागाच्या (Forest Department) जाचक अटींमुळे गेल्या १२ वर्षांपासून बंद पडला आहे. या कारणास्तव वनाधिकाऱ्यांसोबत अनेकदा मीटिंग घेतल्या, मात्र तरीही काम पूर्म होत नसल्याचे नितीन गडकरी म्हणाले. भंडाऱ्यातील पवनी येथील ग्रामीण विकास संस्थेच्या वतीनं आनंद विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळेस त्यांनी वनाधिकाऱ्यांविषयी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.

नितीन गडकरी म्हणाले की, “सरकारच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही, मदतही घ्यायची नाही. मी नेहमी गमतीने म्हणतो की, सरकार विषकन्येसारखं आहे. जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो. म्हणून मी कुठल्याही सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱ्यांकडे जात नाही. अधिकाऱ्यांना गळ घालता घालता डोक्यावरचे केस उडून जातात”, असं नितीन गडकरी म्हणाले.

पुढे भंडारा ते पवनी या रस्त्याचं बांधकाम अनेक प्रयत्नांनंतरही थांबलेलं असल्यानं गडकरी यांनी भंडाऱ्याचे कलेक्टर आणि एसपींना भाषणादरम्यान विनंती करून आपण वैतागलो असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना उद्देशून ‘नवीन कुठलं कलम असल्यास ते लावा आणि या रस्त्यामध्ये आडकाठी घालणाऱ्या नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका’ असं वक्तव्य केलं.

मानवतेच्या सिद्धांताच्या आधारावर माणसाचं कल्याण व्हावं

नितीन गडकरी म्हणाले की, “समाजात कोणता धर्म नाही आणि जाती नाही. गरिबाला जात, पंथ, धर्म आणि जाती नसते, त्यामुळे मानवतेच्या आधारावर विचार केला पाहिजे. महिला, पुरुष, कामगार आणि शेतकरी अशा चारच जाती आहेत. माणूस हा जातीने नाही तर गुणाने मोठा आहे. या समाजातील अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या सिद्धांताच्या आधारावर माणसाचं कल्याण झालं पाहिजे”, असं नितीन गडकरींनी सांगितलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -