Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणNitesh Rane Sindhudurga : सिंधुदुर्गात नितेश राणे यांचीच जादू कायम; ओटव ग्रामपंचायत...

Nitesh Rane Sindhudurga : सिंधुदुर्गात नितेश राणे यांचीच जादू कायम; ओटव ग्रामपंचायत भाजपकडे

जाणून घ्या दुपारी बारा वाजेपर्यंत कोणाच्या खात्यात किती जागा…

सिंधुदुर्ग : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Grampanchayat Elections) काल रविवारी पार पडल्या. राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींची आज मतमोजणी होत आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकींतून आजमावता येणार आहे. यातील काही निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीत सामील असणार्‍या पक्षांनी आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

सिंधुदुर्गात (Sindhudurga) तळकोकणात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांची जादू कायम आहे. कणकवलीतील ओटव ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण राणे कुटुंबियांचं सिंधुदुर्ग भागात मोठं वर्चस्व आहे. कोकणसाठी अनेक विकासकामं राणे कुटुंबियांनी केली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही त्यांचाच दबदबा कायम राहिला आहे.

दरम्यान, आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपनेच सगळ्यांत जास्त जागा जिंकल्या आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार,
भाजप – १५१ जागा
अजित पवार गट – १२६ जागा
शिवसेना – ९८ जागा
काँग्रेस – ६८ जागा
ठाकरे गट – ६० जागा
शरद पवार गट – ५६ जागा
इतर – ८८ जागा
आतापर्यंत एकूण ३७५ जागा मिळवत महायुतीची यशस्वी घोडदौड सुरु आहे. तर मविआला १८४ व इतर पक्षांना ८८ जागा जिंकता आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -