Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीएनआयएची ६ राज्यांमध्ये १०० ठिकाणी छापेमारी

एनआयएची ६ राज्यांमध्ये १०० ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली : एनआयएने देशातील सहा राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्करी याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकले जात आहेत.

दहशतवाद, अंमली पदार्थ तस्कर आणि गँगस्टरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिख फॉर जस्टिस या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानीच्या साथीदार असलेल्या परिसरात एनआयएकडून झडती घेण्यात येत आहे.

लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीतील सदस्यांना आणि अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या सिंडिकेटला तोडण्यासाठी एनआयएकडून हा छापा टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या छाप्यात एनआयएने ७० हून अधिक मोबाईल जप्त केले होते. या मोबाईलमध्ये ड्रग नेक्सस आणि लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीशी संबंधित लोकांची अनेक गुपिते समोर आली होती.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात बसलेले गुंड खलिस्तानी फुटीरतावाद्यांना निधी देऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. १०० पेक्षा अधिक ठिकाणी छाप्यांमध्ये एनआयए टीमचे २०० हून अधिक सदस्य सहभागी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. जसविंदर सिंग मुलतानी हा शिख फॉर जस्टिसचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूचा जवळचा सहकारी असल्याचे मानले जाते आणि तो फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -