Thursday, May 2, 2024
Homeकोकणरायगडनेरळ स्थानकात अपघात रोखण्यासाठी बॅरिकेड्सची गरज

नेरळ स्थानकात अपघात रोखण्यासाठी बॅरिकेड्सची गरज

नेरळ (वार्ताहर) : मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कर्जत दिशेकडील नेरळ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला रूळ ओलांडून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यावेळी सातत्याने अपघात घडत असतात. याचा विचार करून मध्य रेल्वेकडून रूळ ओलांडत असताना होणाऱ्या घटना रोखण्यासाठी बॅरिकेट्स लावण्याची मागणी पुढे येत आहे.

कर्जत या उपनगरीय रेल्वे स्थानकात येण्यासाठी सातत्याने प्रवासी हे रूळ ओलांडत असतात आणि त्यामुळे सातत्याने अपघात होत असतात. या घटना सतत घडत असल्याने अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यात मध्य रेल्वे कामगारांचे नेते प्रवीण तांडेल यांनादेखील आपला जीव गमवावा लागला होता. तांडेल यांच्या अपघाती निधनानंतर नेरळ आणि परिसरातील जनतादेखील हळहळली होती. त्यात मागील काही महिन्यांत महाविद्यालयीन विद्यार्थीला आपले प्राण रेल्वे अपघातात गमवावे लागले आहे. नेरळ रेल्वे स्थानकात उतरून नेरळ विद्या मंदिर ही माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी जाणारे विद्यार्थी हे रूळ ओलांडून जात असतात. दुसरीकडे नेरळच्या पूर्वेकडील भागातील प्रवासी आणि नोकरदार तसेच विद्यार्थी हे दररोज रूळ ओलांडून ये-जा करीत असतात.

मध्य रेल्वे प्रशासनाने असे अपघाती प्रकार रोखण्यासाठी रूळ ओलांडून प्रवास करणारे प्रवासी आणि रहिवाशी यांच्यावर काही निर्बंध आणण्याची गरज आहे. त्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ रेल्वे ५०० मीटर अंतर असे बॅरिकेट्स उभारावे, अशी मागणी होत आहे. या बॅरिकेट्समुळे नेरळ रेल्वे स्थानकात रेल्वे अपघातात प्रवाशांचा बळी जाणार नाही. भिवपुरी रेल्वे स्थानकात रूळ ओलांडणारे प्रवासांचे बळी गेल्यानंतर मध्य रेल्वेकडून लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसे बॅरिकेट्स नेरळ आणि शेलू रेल्वे स्थानकात लावण्याची गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -