Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीदेशात गेल्या 24 तासांत 8503 नवे रुग्ण, 624 रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासांत 8503 नवे रुग्ण, 624 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 8 हजार 503 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे एकूण 23 रुग्ण समोर आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 94 हजार 943 आहे. अशातच या साथरोगामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 74 हजार झाली आहे. आकडेवारीनुसार, काल (गुरुवारी) 7678 कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 5 हजार 66 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 131 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

गुरुवारी 74 लाख 57 हजार 970 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत लसीचे 131 कोटी 18 लाख 87 हजार 257 डोस देण्यात आले आहेत. देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे 23 रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थानतील जयपूर मध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या नवीन प्रकारातील सर्व 9 पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राजस्थानच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांना आरयूएचएस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबतच त्यांना सात दिवस विलगीकरणामध्ये राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

देशात 5 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये नऊ जणांना कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन प्रकाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. यापैकी चार जण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि पाच जण त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ”दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कात आलेल्या 34 लोकांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी नऊ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली, तर 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण 2 डिसेंबरला कर्नाटकात सापडला होता. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 23 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 10 आहे. जागतिक स्तरावर, ओमिक्रॉन व्हेरियंटचे 2 हजार 303 रुग्ण सापडले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -