Sunday, May 5, 2024
Homeक्रीडाराष्ट्रीय पातळीवरील रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाण्याच्या जिम्नॅस्टिकपटूंची चमकदार कामगिरी

राष्ट्रीय पातळीवरील रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाण्याच्या जिम्नॅस्टिकपटूंची चमकदार कामगिरी

संपूर्ण टिमचे महापौर नरेश म्हस्के यांचेकडून कौतुक व शुभेच्छा

ठाणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतासाठी रेकॉर्ड केलेल्या ठाण्याच्या जिम्नॅस्टिकपटूंनी राष्ट्रीय स्तरावर सर्व सुवर्ण पदके जिंकून आपला ठसा उमटवला आहे. जम्मू – काश्मीर येथे नुकत्याच झालेल्या 25 व्या राष्ट्रीय ज्युनियर रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी 8 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य पदके जिंकत राष्ट्रीय स्तरावर ठाण्याचे नाव उंचावले आहे.

या सर्व जिम्नॅस्टिकपटूंचे महापौर नरेश म्हस्के यांनी कौतुक केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी नगरसेवक विकास रेपाळे, उप आयुक्त मनिष जोशी, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -