Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीकुख्यात गँगस्टर पुजारीला चीनमधून भारतात आणण्यात मुंबई क्राईम ब्रँचला मोठे यश...

कुख्यात गँगस्टर पुजारीला चीनमधून भारतात आणण्यात मुंबई क्राईम ब्रँचला मोठे यश…

गॅंगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी चीनमधून अटक केली आहे. प्रसाद पुजारीला मुंबईत आणण्यात आले असून गेल्या काही वर्षांपासून तो फरार होता. पुजारीवर खून आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणामध्ये प्रसाद पुजारीचा हात असल्याचा आरोप आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रसाद पुजारीला मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर चीन सरकारने प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -