Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीफेसबूक, इन्स्टा डाऊनमुळे मार्क झुकरबर्गचे कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान!

फेसबूक, इन्स्टा डाऊनमुळे मार्क झुकरबर्गचे कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान!

कॅलिफोर्निया : काही तांत्रिक अडचणींमुळे जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक (Facebook, Instagram) आणि थ्रेड हे मेटाचे तीनही प्लॅटफॉर्म असलेले सर्व्हर तासाभरासाठी डाऊन झाले होते. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स अक्षरश: मेटाकुटीला आले होते. तर दुसरीकडे तब्बल एक तास फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड या मेटाच्या सर्विसेस डाऊन झाल्याने कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचे लाखो डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

कारण मेटाचे हे तीनही प्लॅटफॉर्म अचानक डाऊन झाल्याने युजर्स यातील कोणत्याही साइट्स वापरू शकत नव्हते. फेसबुकवर तर युजरचे अकाउंट थेट लॉग आऊट होत होते. हा सर्व प्रकार तब्बल एक तास सुरू होता. यादरम्यान झुकरबर्ग यांनी ट्विट करत सर्व काही लवकरच सुरवात होणार असल्याचे देखील सांगितले होते.

मात्र या डाऊनमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले. वीबुश सिक्योरिटीजचे मॅनेजिंग डायरेक्टर डॅन इव्स यांनी सांगितले की, मेटाच्या हे तीनही प्लॅटफॉर्म डबल एक तास डाऊन असल्याने त्यामुळे कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचे ३ बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.

तसेच मेटाच्या शेअरची किंमत देखील यामुळे घटली. ज्यामध्ये तब्बल एक पॉईंट सहा टक्के घसरण झाली. तर मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्ती बद्दल सांगायचं झालं तर फोर्ब्सच्या रियल टाईम बिलेनिअर्सच्या यादीमध्ये मार्क झुकरबर्ग हे जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ज्यांची एकूण संपत्ती १३९.१ बिलियन डॉलर एवढी आहे.

याच प्रकरणी संधी साधत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक एलन मस्क यांनी झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीला टोला लगावला. मस्क यांनी ट्विट करत म्हटले की, तुम्ही ही पोस्ट वाचू शकत आहात त्याचे कारण आमचे सर्व्हर काम करत आहेत. तसेच जगभरातील युजर्स करून ट्विटरवर मीम्सचा वर्षाव करण्यात आला.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे मेटाचे अधिकारी एंडी स्टोन यांनी मेटाच्या सर्विसेस डाऊन झाल्याने युजरची माफी मागितली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -