Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणKonkan Ganeshotsav : पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त कोकणवासीयांसाठी खास भेट!

Konkan Ganeshotsav : पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त कोकणवासीयांसाठी खास भेट!

भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली माहिती… काय आहे ही स्पेशल भेट?

कणकवली : कोकणातला गणेशोत्सव (Konkan Ganeshotsav) म्हटला की चाकरमान्यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. ऑफिसला सुट्टया टाकून पटापट गावच्या बॅगा भरल्या जातात. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही गावी जाण्यासाठी रेल्वे आणि एसटीची बुकिंग (Train booking) फुल झाली आहे. राज्य सरकारकडून जादा गाड्या सोडूनही त्या अपुर्‍या पडत आहेत. त्यातच चाकरमान्यांना खुश करण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान मोदीजींच्या (Narendra Modi) वाढदिवसानिमित्त कोकणवासीयांना एक भेट मिळणार आहे, त्या भेटीचा लाभ घेण्याचे नितेश राणे यांनी आवाहन केले आहे.

‘गणपती बाप्पा मोरया! चला मग यावर्षीदेखील मोदी एक्स्प्रेसने गावाकडे जायचंय ना?’ असं म्हणत नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे. या घोषणेनुसार १७ सप्टेंबर या दिवशी देशाचे आदरणीय व लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोदी एक्स्प्रेस (Modi Express) सोडली जाणार आहे. कोकणवासीयांसाठी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त ही एक खास भेट असणार आहे.

पुढे नितेश राणे यांनी सांगितलं, कोकणवासीयांसाठी दरवर्षी गणपतीत मोदी एक्स्प्रेस सोडण्यात येते. मात्र यावर्षीची मोदी एक्स्प्रेस स्पेशल आहे, कारण यंदा ती मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सोडली जाणार आहे. १७ सप्टेंबला दुपारी १२:३० वाजता दादरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन ही १७ एक्स्प्रेस दरवर्षीसारखी सुटणार आहे. बुकिंगसाठी ५ ते १० सप्टेंबर दरम्यान, कणकवली विधानसभेच्या सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांना संपर्क करु शकता. दरवर्षीप्रमाणे प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सगळी सोय याहीवर्षी करण्यात आलेली आहे, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -