Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIPL 2024कोहलीचे शतक; बंगळूरुने मारली बाजी

कोहलीचे शतक; बंगळूरुने मारली बाजी

सलामीवीरांच्या खेळीमुळे हैदराबादवर सहज मात

हैदराबाद (वृत्तसंस्था) : विराट कोहली (१०० धावा) आणि फाफ डु प्लेसिस (७१ धावा) या सलामीवीरांच्या १७२ धावांच्या मॅरेथॉन भागिदारीमुळे बंगळूरुने हैदराबादला त्यांच्याच घरात ८ विकेट राखून सहज मात दिली. विजयामुळे बंगळूरुने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी आपले इरादे स्पष्ट केले. हे दोन्ही फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजीवर तुटून पडले. विराट कोहलीने ६३ चेंडूंत १०० धावा फटकवल्या. या शतकी खेळीला १२ चौकार आणि ४ षटकारांची जोड होती. फाफ डु प्लेसिसने ७१ धावा जमवताना ७ चौकार आणि २ षटकार लगावले. या सलामीवीरांच्या जोडीने १७२ धावांची भागिदारी करत बंगळूरुचा विजय निश्चित केली होती. केवळ औपचारिकता शिल्लक होती. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद ५ आणि मायकेल ब्रेसवेलने नाबाद ४ धावा जमवत बंगळूरुच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बंगळूरुने १९.२ षटकांत २ विकेटच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. मयांक डागर वगळता हैदराबादचे सर्वच गोलंदाज महागडे ठरले. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. परंतु त्यांना धावांना लगाम घालता आला नाही.

हेनरिच क्लासेनच्या शतकाच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत ५ विकेटच्या बदल्यात १८६ धावा उभारल्या. ब्रुकने नाबाद २७ धावा जोडल्या. हैदराबादचे अन्य फलंदाज धावा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. मायकल ब्रेसवेलने आपल्या एकाच षटकात अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी या दोन्ही सलामीवीरांना बाद करत हैदराबादला बॅकफुटवर टाकले. त्यानंतर हेनरिच क्लासेनने फलंदाजीची सूत्रे स्वत:कडे घेत बंगळूरुच्या गोलंदाजीची पिसे काढली. क्लासेनने ५१ चेंडूंत १०४ धावा करताना ८ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या एकट्याच्या खेळीमुळे हैदराबादला १८६ धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळूरुच्या मायकल ब्रेसवेलने २ षटकांत १३ धावा देत २ बळी मिळवले. मोहम्मद सिराजने आपल्या धावा रोखणाऱ्या गोलंदाजीने अचंबित केले. त्याला एक बळी मिळवण्यात यश आले. सिराजने ४ षटके फेकत केवळ १७ धावा देत १ विकेट मिळवली. शहबाज अहमद आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. परंतु त्यांना धावा रोखण्यात यश आले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -