Friday, May 3, 2024
Homeदेशजागतिक स्तरावर खादीची पुन्हा मोहोर!

जागतिक स्तरावर खादीची पुन्हा मोहोर!

'पॅटागोनिया' द्वारे दखल

अहमदाबाद (हिं.स) : शाश्वत आणि शुद्धता यांचे प्रतिक असलेल्या खादीने (Khadi) जागतिक फॅशन विश्वात मोठी भरारी घेतली आहे. अमेरिका स्थित जागतिक स्तरावरचा अग्रगण्य फॅशन ब्रँड, ‘पॅटागोनिया’, डेनिम कपडे तयार करण्यासाठी आता हाती बनवलेल्या खादी डेनिमचा उपयोग करत आहे. पॅटागोनियाने, वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या नामांकित अरविंद मिल्स द्वारे 1.08 कोटी रुपये किमतीच्या सुमारे 30,000 मीटर खादी डेनिम कापडाची गुजरातमधून खरेदी केली आहे.

जुलै 2017 मध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी), अहमदाबादच्या अरविंद मिल्स समवेत, खादी डेनिम उत्पादनाचा जगभरात व्यापार करण्यासाठी करार केला. तेव्हापासून अरविंद मिल्स, गुजरातमधल्या, केव्हीआयसीचे प्रमाणित खादी संस्थांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात खादी डेनिम कापडाची खरेदी करत आहे.

पॅटागोनियाच्या खादी डेनिम खरेदीमुळे, खादी कारागीरांसाठी अतिरिक्त 1.80 लाख मनुष्य तास म्हणजेच 27,720 मानव दिवस कामाची निर्मिती झाली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये कामाची ऑर्डर नोंदवण्यात आली आणि नियोजित 12 महिन्याच्या काळात म्हणजेच ऑक्टोबर 2021 मध्ये याची पूर्तता करण्यात आली.

खरेदीला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी पॅटागोनियाने, जागतिक मुल्यांकन करणाऱ्या एनईएसटी, नेस्ट या अमेरिका स्थित त्रयस्थ कंपनीची नियुक्ती केली. गोंडाळ इथे डेनिम उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेचे म्हणजेच कताई, विणणे, कार्डिंग,डायिंग, मजुरी, मजुरांच्या वयाची पडताळणी यासारख्या उत्पादनाशी निगडीत संपूर्ण प्रक्रियेचे मुल्यांकन करण्यासाठी ही त्रयस्थाची नियुक्ती करण्यात आली.

नेस्टने उद्योग भारती येथे सर्व निकषांचे मुल्यांकन केल्यानंतर कताई आणि हातमाग विणकाम, नेस्टचे हस्तकला सील साठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र दिले. देशातल्या खादी संस्थेच्या कार्यव्यवहारात, नैतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी आंतरराष्ट्रीय त्रयस्थ मुल्यांकन कर्त्याकडून, प्रमाणपत्र आणि मुल्यांकनाची ही पहिलीच वेळ आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -