Sunday, May 12, 2024
HomeदेशJN-1 Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून कसा कराल स्वतःचा आणि लहान मुलांचा...

JN-1 Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून कसा कराल स्वतःचा आणि लहान मुलांचा बचाव?

मुंबई : सध्या जगभरात कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिएंट जेएन-१चा (JN-1 Variant) प्रादुर्भाव लक्षात घेता काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोना महामारी एकदा अनुभवल्यामुळे आणि यात प्रचंड शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागल्यामुळे अनेकजण कोरोनाच्या या नव्या प्रकाराला तितकंसं मनावर घेत नाहीत. पण असा निष्काळजीपणा केल्यास तो अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. हे काळजी करण्याचे कारण नसले तरी काळजी घेण्याचे नक्कीच आहे. आतापर्यंत देशातील १२ पेक्षा जास्त राज्यांमध्ये जेएन-१ चे रुग्ण आढळल्याने आता कोळजी घेणे गरजेचे आहे.

शुक्रवारपर्यंत सुमारे ६१९ लोकांना नव्या JN.1 सब-व्हेरियंटचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1 सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा उपप्रकार आहे, त्यामुळे चिंता जास्त वाढली आहे. हा विषाणू काळानुसार स्वत:मध्ये बदल करून अधिक शक्तिशाली बनत असल्याचं अभ्यासात आढळलं आहे. ओमायक्रॉन विषाणूचे सर्व व्हेरियंट रुग्णाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करून संक्रमण सहजपणे वाढवू शकतात. ज्यामुळे कोरोनाची आणखी एक लाट येण्याची भीती निर्माण झाली आहे.

लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका

JN.1 सब-व्हेरियंटचा संसर्ग लहान मुले आणि वृद्धांना होण्याचा धोका जास्त आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या लसीकरणामुळे या नवीन JN.1 सब-व्हेरियंटपासून पूर्णपणे संरक्षण मिळते की नाही हे अद्याप अभ्यासात स्पष्ट झालेलं नाही. JN.1 सब-व्हेरियंटवर कोरोना लस नेमकी किती प्रभावी आहे, याबाबत स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे नागरिकांनी दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलांसह ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतर कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या सर्व लोकांनी संसर्गापासून स्वतःचं संरक्षण करण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

कसं कराल संरक्षण?

  • घराबाहेर पडताना किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा.
  • स्वच्छतेच्या उपायांचे पालन करा.
  • पालकांनी मुलांना विषाणूबद्दल माहिती देऊन त्यांना शिक्षित करा आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी काय करावं लागेल, याचं मार्गदर्शन करा.
  • मुलांना हाताची नियमित स्वच्छता राखण्यास सांगा.
  • मुलांना कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका.
  • शाळेत जाताना मास्क घालण्याचा आणि हाताच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा सल्ला द्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -