Sunday, April 28, 2024
Homeदेश१४ फेब्रुवारी व्हॅलंटाईन डे की पुलवामा हल्ल्याची चार वर्ष?

१४ फेब्रुवारी व्हॅलंटाईन डे की पुलवामा हल्ल्याची चार वर्ष?

मुंबई: १४ फेब्रुवारी तुम्ही व्हॅलेंटाईन डे म्हणून उत्साहात साजरा करणार असाल. अर्थातच हा दिवस इतरांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठीच प्रसिद्ध आहे. या दिवशी अनेकजण प्रेमाचे संदेश देऊन कार्ड, फुले किंवा चॉकलेट एकमेकांना पाठवतात. परंतू १४ फेब्रुवारी म्हणजे फक्त व्हॅलेंटाईन डे इतकीच याची ओळख आहे का?

पुलवामा हल्ला

चार वर्षांपूर्वी, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघाती बॉम्बरने दहशतवादी हल्ला केला होता, ज्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यामुळे परिणामी २०१९ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष झाला होता. या वर्षी ‘पुलवामा हल्ल्याला’ चौथे वर्ष पूर्ण होत आहे.

Digital Rupee

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आर्थिक साक्षरता सप्ताह

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 2016 पासून दरवर्षी वित्तीय साक्षरता सप्ताह (FLW) साजरा करतो. यामध्ये देशभरात एखाद्या विशिष्ट थीमवर आर्थिक साक्षरता संदेश प्रसारित केला जातो. चालू वर्षासाठी निवडण्यात आलेल्या थीममध्ये आर्थिक बचत आणि नियोजन तसेच डिजिटल वित्तीय सेवांचा योग्य वापर याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.


आंतरराष्ट्रीय पुस्तक आदान-प्रदान दिन

१४ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय पुस्तक आदान-प्रदान दिन म्हणूनही साजरा केला जातो. पुस्तकांचे आदान-प्रदान व वाचनाची आवड वाढविण्याच्या दृष्टिने या दिवसाचे विशेष महत्व आहे.

Library

ग्रंथालय प्रेमी दिन

ग्रंथालयप्रेमी, ग्रंथपाल, ग्रंथप्रेमी यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी ग्रंथालय प्रेमी दिन देखील साजरा केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -