Friday, May 3, 2024
HomeदेशIndian Passport: भारतीय पासपोर्टची ताकद वाढली, पाहा कितव्या स्थानावर पोहोचला

Indian Passport: भारतीय पासपोर्टची ताकद वाढली, पाहा कितव्या स्थानावर पोहोचला

नवी दिल्ली: भारतीय पासपोर्टची(passport) ताकद पुन्हा एकदा वाढली आहे. आता भारतीय पासपोर्टने ३ स्थानांनी उडी घेत ८०व्या स्थानावर पोहोचला आहे. असेही म्हणता येऊ शकता की भारत आता पासपोर्टच्या जगातील ८०वा सर्वात ताकदवान पासपोर्ट बनला आहे.

६२देशाना मिळाला व्हिसा फ्री अॅक्सेस

हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या ताज्या माहितीनुसार भारतीय पासपोर्टला उझबेकिस्तानसोबत ८०व्या स्थानावर ठेवण्यात आला आहे. आता भारताचे लोक ६२ देशांमध्ये व्हिसा फ्री अॅक्सेस मिळवू शकतात. त्या देशांमध्ये भूतान, ब्रिटीश व्हर्जिन आयलड, बार्बाडोस, थायलंड, जॉर्डन, मलेशिया, मालदीव, श्रीलंका, मॉरिशस आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.

या देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल

काही आणखीही असे देश आहेत जिथे भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळत आहे. या देशांमद्ये कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मान्यमार, तिमुर-लेस्टे, बोलिव्हिया, बुरूंडी, केप वेर्डे आयलँड्स, कोमोरो आयलँड, जिबुती, गाबोन, मेडागास्कर, सेशेल्स, मॉरिटेनिया, मोझाम्बिक, सिएरा लिओन, सोमालिया, समोआ, तंजानिया आणि झिम्बाब्वेचा समावेश आहे.

भारतानतर या देशांचा नंबर

याआधी २०२३मध्ये भारतीय पासपोर्टची रँकिग ८३ इतकी होती. आता २०२४मध्ये भारतानंतर हेनली इंडेक्सवर भूतान, चाड, इजिप्त, जॉर्डन, म्यानमार, अंगोला, मंगोलिया, मोझाम्बिक, ताजिकिस्तान, मेडागास्कर, बुर्किना फासो, कोटे डी आयवर, इक्विटोरियल गिनी, सेनेगल, अल्जीरिया, कंबोडिया आणि माली या देशांचे स्थान आहे.

सगळ्यात ताकदवान पासपोर्ट

सगळ्यात ताकदवान पासपोर्टबाबत बोलायचे झाल्यास फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन अव्वल स्थानावर आहेत. या देशातील लोक व्हिसाशिवा १९४ देशांत जाऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -