Friday, May 3, 2024
HomeदेशINDIA:काय असेल जागावाटपाचा फॉर्म्युला? शरद पवारांच्या घरी समन्वय समितीची बैठक

INDIA:काय असेल जागावाटपाचा फॉर्म्युला? शरद पवारांच्या घरी समन्वय समितीची बैठक

मुंबई: इंडिया आघाडीच्या (INDIA) समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी होत आहे. या बैठकीच्या अजेंड्यामध्ये लोकसभा निवडणूक २०२४साठीच्या (loksabha election 2024) जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि अभियानाबाबत रणनीतीवर मोठी चर्चा होणार आहे.

समन्वय समितीमध्ये विविध पक्षांचे १४ नेते सामील आहेत. समितीची बैठक संध्याकाळी एनसीपी प्रमुख शरद पवारांच्या निवासस्थानी होईल. पीटीआयच्या माहितीनुसार सूत्रांनी सांगितले की अनेक पक्षांच्या नेत्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर ठरवावा अशी मागणी केली आहे.

कसा ठरणार जागा वाटपाचा फॉर्म्युला

अनेक नेत्यांच्या मते पक्षांना जागा वाटपाचा फॉर्म्युला बनवण्यासाठी आपापला अहंकार बाजूला ठेवायला हवा. जागा वाटपासाठी कोणते मानदंड असणार आहेत याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल पाहत जागांवरील पक्षाच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

तीन गोष्टींची करावा लागेल त्याग – आप नेते राघव चढ्ढा

बैठकीच्या आधी समन्वय समितीचे सदस्य आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा म्हणाले की लोकांपर्यंत पोहोचणे, रॅलीचे आयोजन तसेच घर-घर अभियान चालवण्याबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.हे प्रत्येक राज्यासाठी वेगळे असेल.

ही आघाडी यशस्वी बनवण्यासाठी प्रत्येक राजकीय नेत्याला तीन गोष्टींचा त्याग करावा लागेल – महत्त्वाकांक्षा, मतभेद आणि मनभेद.

समन्वय समितीत हे नेते सामील

कांग्रेस नेता केसी वेणुगोपाल, डीएमके नेता टीआर बालू, जेएमएम नेता हेमंत सोरेन, शिवसेना-यूबीटी नेता संजय राऊत, आरजेडी नेता तेजस्वी यादव, ‘AAP’ नेता राघव चड्ढा, समाजवादी पार्टीचे नेते जावेद अली खान, जेडीयू नेता ललन सिंह, सीपीआई नेता डी राजा, नेशनल कॉन्फ्रेंस नेता उमर अब्दुल्ला, पीडीपी नेता महबूबा मुफ्ती, टीएमसी नेता अभिषेक बनर्जी आणि सीपीआय-एम च्या एका सदस्याचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -