Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीधावत्या रेल्वेत कसे ऑर्डर करणार बाहेरचे जेवण? ही आहे पद्धत

धावत्या रेल्वेत कसे ऑर्डर करणार बाहेरचे जेवण? ही आहे पद्धत

मुंबई: भारतीय रेल्वे(indian railway) आता जगातील सर्वात चांगली सुविधा देणारी रेल्वे सेवा बनत आहे. रेल्वेच्या प्रवासादरम्यान आता लोकांना बऱ्याच सुविधा मिळतात. याआधी लोकांना रेल्वेच्या आत जे काही खायला मिळत असे तेच ऑर्डर करता येत होते. मात्र आता लोक रेल्वेमध्ये बसल्या-बसल्या बाहेरचे खाणे ऑर्डर करू शकतात. जाणून घ्या कसे ते…

अॅप अथवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मागवू शकता

भारीय रेल्वे प्रवाशांसाठी सतत चांगल्या सोयीसुविधा आणत आहे. आता प्रवाशांना आपल्या आवडीचे खाणे रेल्वेत बसल्या बसल्या मिळणार आहे. आयआरसीटीसीकडून यासाठी वेगळी वेबसाईट बनवण्यात आली आहे. जेवण ऑर्डर करम्यासाठी तुम्ही www.ecatering.irctc.co.in वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता.

सोबतच भारतीय रेल्वेकडून +91-8750001323 हा व्हॉट्सअॅप नंबरही जारी करण्यात आला आहे. यावर मेसेज पाठवून तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता. तुम्ही केवळ जेवणच ऑर्डर करू शकत नाहीत तर तुमची ऑर्डर कुठपर्यंत आली हे ही पाहू शकता.

असे करू शकता ऑनलाईन ऑर्डर

रेल्वेमध्ये ऑनलाईन खाणे मागवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी www.ecatering.irctc.co.in या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या रेल्वेचा नंबर आणि बोर्डिंगची तारीख निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला स्टेशन निवडावे लागेल. यानंतर फाईंड फूड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला रेस्टॉरंट निवडावे लागेल. यानंतर पीएनआर नंबर टाकून तुम्ही तुमचे खाणे ऑर्डर करू शकता. याशिवाय स्विगी, झोमॅटोसह अनेक फूड डिलीव्हरी कंपन्या आयआरसीटीसीसोबत मिळून प्रवाशांपर्यंत खाणे पोहोचवण्याचे काम करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -