Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीमुंबईसह राज्यात आजही मुसळधार!

मुंबईसह राज्यात आजही मुसळधार!

मुंबई : मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. याचा रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, वसई- विरार, पालघर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच, पावसाच्या संततधारेमुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य, हार्बर मार्गावरील लोकल उशिराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकांत रुळांवर काही प्रमाणात पाणी साचले होते. अशातच आता लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूकही खोळंबली आहे.

पुराच्या पाण्यातून नदी पार करणे बेतले जीवावर, स्कॉर्पिओ बुडाली

कालपासून ठाणे शहरांत प्रचंड पाऊस कोसळत आहे. पावसामुळे दरवर्षी ज्या ठिकाणी हमखास पाणी साचते अशा वंदना सिनेमा चौकात पाणी साचले आहे. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी सध्या कमी आहे. त्यामुळे अजूनही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास भरतीच्या वेळेस पाण्याची पातळी वाढून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊ शकतो.

पश्चिम विदर्भात महिनाभरात वीज पडून २२ जणांचा मृत्यू

दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने अजूनही विश्रांती घेतली नाही. कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर आहे. गडचिरोलीमध्ये पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, विदर्भाच्या काही भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे राज्यभर धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग तासागणिक वाढवला जात आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर कायम; ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट!

लोणावळ्यात पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन प्रशासनाने सायंकाळी ५ नंतर भुशी धरणाकडे जाण्यास बंदी घातली आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.

या बातम्याही वाचा…

वसईत दरड कोसळली

मुंबई-अहमदाबाद हायवेवर दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे रामकुंड परिसरातील सर्वच मंदिरे गेली पाण्याखाली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -