Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीकष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊदे ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आंगणेवाडी येथे...

कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊदे ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आंगणेवाडी येथे आई भराडी देवीला प्रार्थंना

मसुरी : कोकणवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई भराडीदेवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी दर्शन घेतले आहे. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्वागत कक्षात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना, कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरीही दरवर्षी न चुकता अंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो. आज माझे सौभाग्य की मला आई भरडीदेवीचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊ दे. देवीच्या आशीर्वादाने एक सेवक म्हणून राज्याचे काम करण्याची संधी मिळाली आहे. लाखो भाविक यात्रेला येतात. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे. आंगणे कुटुंबीय भाविकांना सेवा सुविधा देऊन मोठे काम करत आहेत. शासनाच्या माध्यमातून याठिकाणी सुविधा देण्यासाठी काही कमी पडणार नाही. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नव्याने सूचना दिलेल्या आहेत. देवीच्या परवानगीने भक्त निवास सुद्धा मार्गी लागेल. देवीचे सत्व आपल्या भक्तांना येथ पर्यंत घेऊन येते. तसाच मी सुद्धा आलो आहे. राज्याचे मुख्यमंत्री पद मिळूण्या मागे भराडी आईचे आशीर्वाद आहेत. सर्व सामान्यांसाठी हे सरकार काम करत आहे, कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यात येईल. सिंचनासाठी बारमाही पाण्याची व्यवस्था झाल्यास वाहून जाणारे पाणी शेतीस उपयोगी होणार आहे. सिंधुदुर्ग ते मुंबई एक्सप्रेस रस्ता होत आहे. कोकण विकास क्षेत्र प्राधिकारण्याच्या माध्यमातून अनेक सोविधा देण्यात येणार आहेत. आंगणेवाडीसाठी आवश्यक सुविधा सुचवा, सरकार म्हणून कुठे कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजप नेते निलेश राणे, आ रवींद्र फाटक, जिल्हा पोलीस प्रमुख सौरभकुमार अग्रवाल, जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे,तहसीलदार वर्षा झाल्टे, अध्यक्ष भास्कर आंगणे, आनंद आंगणे, बाळा आंगणे, बाबू आंगणे, मधुकर आंगणे आदी उपस्थित होते.

शक्य तिथे बंधारे बांधून पाणी अडवा

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर ‘कोकण विकास प्राधिकरण’ स्थापन केले असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील. तसेच कोकणातील नद्यातून वाहून जाणारे पाणी बंधारे बांधून अडवण्याची गरज आहे, शक्य तिथे असे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याची सूचना देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

समितीच्या सूचनेनुसार मंदिर परिसर विकासाचा प्रस्ताव

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई-सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आंगणेवाडीतील या आई भराडीदेवीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात. त्यांच्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी नक्की देण्यात येईल, त्यासाठी मंदिर समितीने आपल्या सूचना द्याव्यात आणि त्यानुसार मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर तयार करण्यात येईल असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -