Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीठाकरेंच्या काळात घरभरणी, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकासाची पायाभरणी

ठाकरेंच्या काळात घरभरणी, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकासाची पायाभरणी

“याकूबची कबर सजवणे, मनसुख हिरेनची हत्या, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी, बदल्यांमध्ये वसूली आणि सचिन वाझे… रस्त्यावर खड्डे, नाले सफाईत भ्रष्टाचार, कोविडमध्ये नातेवाईकांची भलामण, मेट्रो कारशेड रखडवणे, ही तुमच्या काळातील विकास कामे.. याचे सगळे श्रेय निर्विवाद तुम्हालाच..!”-आशिष शेलार

मुंबई : आमच्याच कामांचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत असे ठाकरे गटाने म्हटल्यावर उद्धव ठाकरेंच्या काळात घरभरणी झाली, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकासाची पायाभरणी होत आहे, असे म्हणत याकूबच्या कबर सजावटीपासून नालेसफाईतल्या भ्रष्टाचारापर्यंत सगळे श्रेय उद्धव ठाकरेंचेच आहे, खास खोचक शैलीत भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

मुंबईत विविध कामांचे भूमिपूजन आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. यावरून ठाकरे गटाने आम्ही केलेल्या कामांचेच उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय हे सरकार घेत आहे, अशी आरोपांची जंत्री ठाकरे गटाकडून लावली आहे. या सगळ्याला आशिष शेलार यांनी चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. याकूबच्या कबर सजावटीपासून नालेसफाईतल्या भ्रष्टाचारापर्यंत सगळे श्रेय उद्धव ठाकरेंचेच आहे, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

याकूबची कबर सजवणे… मनसुख हिरेनची हत्या, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी, बदल्यांमध्ये वसूली आणि सचिन वाझे… रस्त्यावर खड्डे, नाले सफाईत भ्रष्टाचार… कोविडमध्ये नातेवाईकांची भलामण… मेट्रो कारशेड रखडवणे.. ही तुमच्या काळातील विकास कामे.. याचं सगळ श्रेय निर्विवाद तुम्हालाच..! आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि लोकार्पण होतेय ही सगळी मुंबईकरांची स्वप्नपूर्ती आहे… त्यामध्ये शिवसेना (उ.बा.ठा.) तुमचा काय संबंध? संबंध असलाच तर विरोध करण्या एवढाच! म्हणूनच आज मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाच्या क्षणात पण विरजण घालताय!, असे आशिष शेलार यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

‘पंतप्रधान मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवतरत आहेत हा प्रचार खोटा आहे. ते त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी व मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय? या भविष्यातील विचाराने येत आहेत. नव्हे, पंतप्रधानांना त्याच हेतूने मुंबईस बोलावले आहे. पंतप्रधानांच्या शुभहस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन वगैरे कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवसेनेच्या कार्यकाळात ज्या योजनांसाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यात आली होती, नियोजन आराखडा तयार करण्यात आला, कायदेशीर अडथळे दूर करण्यात आले, त्याच सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी करीत आहेत आणि त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे’, अशा शब्दांत भाजपावर टीकास्र सोडण्यात आलं आहे.

या टीकेचा समाचार आशिष शेलार यांनी घेतला आहे. त्यांनी मनसुख हिरेनची हत्या ते मुंबईतल्या कोविड काळात झालेला भ्रष्टाचार हे सगळेच मुद्दे उपस्थित करत उद्धव ठाकरेंचे हे श्रेय निर्विवाद आहे, असे म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -