Friday, May 3, 2024
HomeदेशCanada Travel Advisory: जम्मू-काश्मीरला जाऊ नका, भारतासोबत वादादरम्यान कॅनडाचा आपल्या नागरिकांना सल्ला

Canada Travel Advisory: जम्मू-काश्मीरला जाऊ नका, भारतासोबत वादादरम्यान कॅनडाचा आपल्या नागरिकांना सल्ला

नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणावरून(hardeep singh nijjar murder case) सुरू असलेल्या भारतासोबतच्या वादादरम्यान कॅनडाने(canada) आपल्या नागरिकांसाठी मंगळवारी अॅडव्हायजरी जारी केली. यात कॅनडाने आपल्या देशातील लोकांना जम्मू-काश्मीरला(jammu-kashmir) न जाण्याचा सल्ला दिला आहे.

कॅनडाने ही सूचना देण्यामागे सुरक्षेचे कारण असल्याचे सांगितले आहे. जम्मू-काश्मीरला जाऊ नका कारण येथे दहशतवाद, नागरी अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. कॅनडाने हा सल्ला अशा वेळेस दिला जेव्हा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा एजंट सामील अअसल्याचे म्हटले आहे.

कॅनडाने उचललेल्या या चिथावणीखो पावलावर भारताने कडक प्रतिक्रिया दिली आहे तसेच कॅनडाने भारतावर केलेले आरोप हे निरर्थक असल्याचे म्हटले आहे. सोबतच कॅनडाच्या राजदूतांची हकालपट्टी केली आहे.

 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो काय म्हणाले?

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले की भारत सरकारने या प्रकऱणाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आम्ही उकसवण्याची अथवा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. आम्ही केवळ तथ्य समोर ठेवत आहोत.

ट्रुडो पुढे म्हणाले की, आम्ही सर्व काही स्पष्ट करण्यासाठी तसेच योग्य प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारसोबत काम करू इच्छितो.

काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी १८ जूनला कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एका गुरूद्वाराबाहेर निज्जर याची हत्या केली होती. त्यावरून कॅनडा आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -