Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीJitendra Awhad : आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

Jitendra Awhad : आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

बदनामीकारक मजकूर ट्विटरवर अपलोड करणे भोवणार

नागपूर : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याबाबत ट्विटरवर बदनामीकारक (Defamation) मजकूर टाकणारे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागपूर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष संध्या गोतमारे व पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ९ जून रोजी रात्री १२ वाजून ३३ मिनिटांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटरवर अपलोड केला आहे. हा त्यांना बदनाम करण्याचा व त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठवण्याचा प्रकार आहे.

याची चौकशी करून आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजप नागपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा संध्या गोतमारे, महामंत्री राजूताई भोले, कल्पना सगदेव, अनिता गुप्ता, ललिता झलके ,जयश्री हिंगने, लक्ष्मी बैंस, पूजा धांडे, मौसमी गुप्ता, छाया शुक्ला, सुनिता चोपावार कल्याणी जयपुरकर, खान, कंगाली यांनी पोलीस अधिक्षकांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

याआधी कालच भाजप महिला मोर्चा मालवण तालुक्याच्यावतीने आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे.

भाजप महाराष्ट्र महिला मोर्चा सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य रश्मी लुडबे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पूजा करलकर, माजी नगरसेविका पूजा सरकारे, राणी पराडकर, मिलन कांबळी, वंदना चुडनाईक आदी महिला कार्यकर्त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंडगे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनिधींकडून समाजात महिला सबलीकरण तसेच सामाजिक, आर्थिकस्तरावर महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. जिथे महिलांवर अन्याय होतो, तिथे आवाज उठवतो; पण सध्या भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार आव्हाड करत आहेत. चित्रा वाघ यांची मानहानी करून त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रकार आव्हाड यांनी केला आहे. हे सहन केले जाणार नाही. याबाबत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -