Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीमरणानंतरही मरण यातना, आवढाणीत मृतदेहाचा केला वाहत्या पाण्यात अंत्यविधी

मरणानंतरही मरण यातना, आवढाणीत मृतदेहाचा केला वाहत्या पाण्यात अंत्यविधी

मनोर: डुकले पाड्यातील विष्णू नारायण शेलार यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चिता रचलेल्या भागात हात नदीच्या पुराचे पाणी भरल्याने वाहत्या पाण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना आवंढाणी येथे घडली आहे. यावेळी ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान अर्धवट जळलेला मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे बोलले जात आहे. साचलेल्या पाण्यातच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. चिल्हार आवंढाणी ग्रामपंचायत हद्दीतील आवंढाणी गावच्या डुकले पाड्यात चिता रचलेल्या ठिकाणी हात नदीच्या पुराचे पाणी भरले होते. या साचलेल्या पाण्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आदिवासी बहूल वस्तीसाठी स्मशानभूमीच नसल्याने प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे आदिवासींना मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत आहेत. डुकले पाड्याच्या ग्रामस्थांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात जीवनावश्यक सोयी सुविधांचा अभाव आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी मोर्चे काढावे लागतात. वर्षानुवर्षे गटार,पाणी,रस्ते,वीज सारख्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काम करूनही पायाभूत सुविधा गाव पाड्यात पोहोचवण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -