Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीसावधान! रायगडमध्ये कोरोना वाढतोय

सावधान! रायगडमध्ये कोरोना वाढतोय

अलिबाग: कोरोनाबाबतची बेपर्वाई आता रायगडकरांच्या चांगलीच अंगलट येत आहे. रायगड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढ चिंताजनक बनत चालली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारांवर पोहोचली आहे. पनवेल महानगरपालिका आणि त्यालगतच्या परीसराच दररोज सरासरी पावणे दोनशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्याचा संक्रमणदर झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

गुरुवारी ९९, शुक्रवारी १८०, शनिवारी १९६ तर रविवारी २८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यावरून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दररोज पावणे दोनशेहून अधिक नवे करोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. ही एक चिंताजनक बाब आहे. पनवेल मनपाच्या हद्दीत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६२९ वर पोहोचली आहे. तसेच, उर्वरीत जिल्ह्यात ३७४ कोरोनाबाधित आहे. यात पनवेल ग्रामीण हद्दीतील १३२, उरण २६, खालापूर २८, कर्जत २५, पेण ४७, अलिबाग ६४, मुरुड २, माणगाव १४, तळा १, रोहा १८, श्रीवर्धन २, म्हसळा ३, महाड ९ आणि पोलादपूरमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. तथापि, सुधागड तालुका सध्या कोरोनामुक्त आहे.


डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील उपाचाराधीन रुग्णांचे प्रमाण १७० पर्यंत कमी झाले होते. दररोज सरासरी ३० ते ४० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे कोरोना गेला अशी बेफकरी लोकांमध्ये वाढली होती. कोरोना नियमांचा विसर पडला होता. मास्क, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे उल्लंघन सुरू झाले होते. ही बेपर्वाई अंगलट आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना संक्रमण दरही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.


कोरोनाची आजवरची स्थिती

जिल्ह्यात गेल्या पावणे दोन वर्षांत एकूण १ लाख ७३ हजार ३०८ करोनाबाधित आढळून आले. यातील १ लाख ६७ हजार ९४७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले. तसेच, ४ हजार ५८८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून मृत्यूदर ३ टक्के आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्याचा मृत्यूदर अधिक आहे.

ओमायक्रॉनचाही शिरकाव

जिल्ह्यात ओमायक्रॉनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्वजण पनवेल मनपा हद्दीतील आहेत. यातील सहा रुग्णांची परदेश दौऱ्याची पार्श्वभूमी आहे. तसेच, दोघे परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत. ओमायक्रॉनची प्रसारक्षमता पूर्वीच्या विषाणूंपेक्षा अधिक असल्याने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.


रविवारी २८४ जणांना कोरोनाची लागण

रविवारी पनवेल मनपा हद्दीत सर्वाधिक १८५ रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल पनवेल ग्रामीण हद्दीत ३४, उरण ९, खालापूर ५, कर्जत ४, पेण ८, अलिबाग ३०, माणगाव २ रोहा येथे ५, म्हसळा १, पोलादपूर १ रुग्ण आढळून आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -