मुंबई : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सामूहिक अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
भंडाऱ्यात घडलेले हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आणि त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही, असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची प्रकृती गंभीर
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही, हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत.