Friday, May 3, 2024
Homeदेशश्रीराम मंदिर निर्मितीसाठी दान केलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स

श्रीराम मंदिर निर्मितीसाठी दान केलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स

अयोध्या : श्रीराम मंदिर निर्मितीसाठी दान केलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स झाल्याची खळबळजनक माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी मोजताना उघडकीस आली आहे.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजलेला नाही. काही जिल्ह्यानिहाय ऑडिटींगचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. सध्या देशातून आलेल्या निधीची मोजणी सुरू आहे. यामध्ये रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला धक्कादायक अनुभव आला आहे. ट्रस्टच्या वतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे ५४५७.९४ कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास २२ कोटींच्या रक्कमेचे चेक बाऊन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे. त्यातून हे चेक का वटले नाहीत याचा खुलासा होणार आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे बाऊन्स झालेल्या चेकबाबत बँकेसोबत चर्चा करण्यात येणार आहे. सध्या मिळालेल्या वृत्तानुसार, कूपन, डिजीटल माध्यमातून आणि पावतींच्या माध्यमातून २२५३.९७ कोटींची निधी जमवण्यात आला आहे. एसबीआय-पीएनबी आणि बँक ऑफ बडोदामधील बचत खात्यात जवळपास ४५० कोटी रुपयांचा निधी जमला आहे. ट्रस्टने निधीसाठी दहा रुपये, शंभर रुपये आणि एक हजार रुपयांचे कूपन छापण्यात आले होते. या रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेसाठी पावत्यांचा वापर करण्यात आला.

ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, १० रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून ३०.९९ कोटी रुपये, १०० रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून ३७२.४८ कोटी रुपये आणि एक हजार रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून २२५.४६ कोटी रुपये आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून १६२५.०४ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. अशा प्रकारे २२५३.९७ कोटींचा निधी जमवण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -