Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमीChandrashekhar Bawankule : खंडणी वसुली गँग चालवणारी, राज्याला लुटणारी उद्धव ठाकरेंची महाभ्रष्टाचारी...

Chandrashekhar Bawankule : खंडणी वसुली गँग चालवणारी, राज्याला लुटणारी उद्धव ठाकरेंची महाभ्रष्टाचारी आघाडी!

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार

मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष (Political Parties) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील चंद्रपूर (Chandrapur) येथील सभेत उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पक्ष बनावट शिवसेना असल्याची घणाघाती टीका केली. त्यावर उद्धव ठाकरेंनी आज मविआच्या (MVA) एकत्र पत्रकार परिषदेत भाजप व पंतप्रधान मोदींवर टीका केली. या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटल्याचा पलटवार बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एक्स (X) अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र उपसलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘महाभ्रष्टाचारी आघाडीने ज्यांच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटलं ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. हा एक मोठा विनोद आहे. मविआचं सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होतं? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला शंभर कोटी वसुलीची सुरूवात कोणी केली होती? याचं आधी उबाठा यांनी उत्तर द्यावं’.

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, ‘खरं तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केलं. ते आता नकली शिवसेना घेऊन सोनियांना शरण गेले आहेत. त्यामुळेच तुकडे गँगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामा देखील उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय. पण उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं २०१४, २०१९ प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार आहे आणि ४ जूननंतर तुम्हालाही घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल. अब की बार ४०० पार’, असं जोरदार प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -