Monday, May 5, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

अतिरेक्यांना मदत करणाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

अतिरेक्यांना मदत करणाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू श्रीनगर : पहलगाममध्ये हल्ला करुन २६ नागरिकांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांना अन्न, पाणी आदी स्वरुपाची मदत करणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सुरक्षा पथकाला अतिरेक्यांच्या मदतनिसाविषयी ठोस माहिती मिळताच कारवाई सुरू केली. अटकेची जाणीव होताच अतिरेक्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पळायला सुरुवात केली. घनदाट जंगलातून सुरक्षा पथकांना चकवण्याचा प्रयत्न त्याने केला. पण सुरक्षा पथकाचे जवान त्याला पकडण्यासाठी पाठलाग करत होते. अखेर पळणे कठीण आहे असे जाणवू लागताच जवळून वाहणाऱ्या नदीत उडी टाकून तरुणाने सुरक्षित अंतर गाठण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नदीमार्गे पळण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला. सुरक्षा पथकाने नदीच्या प्रवाहातून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. जम्मू काश्मीरमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुण घनदाट जंगलातून पळत नदीत उडी मारताना दिसत आहे. याच तरुणाने अतिरेक्यांना मदत केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. मृत तरुणाचे नाव इम्तियाज अहमद मगरे असे आहे. तो २३ वर्षांचा होता. इम्तियाज कुलगाम जिल्ह्यातील दमहाल हांजीपोरा भागातील तंगमार्ग येथील राहणारा होता. पैशांसाठी तंगमार्ग येथील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना जेवणं आणि निवारा दिला होता. नवा वाद भडकला सुरक्षा पथक इम्तियाज नदीत बुडून मेल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात इम्तियाजला सुरक्षा पथकाने अटक केली होती. नंतर चौकशी झाल्यावर त्याला पाण्यात बुडवून मारण्यात आले; असा आरोप पॉप्युलर डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी केला.
Comments
Add Comment