Monday, May 5, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार

अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधारेविषयी 'आयएमडी 'चा अंदाज

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक दिसत आहे. संपूर्ण विदर्भात ४० अंशांच्या पुढे पार गेल्याने धडकी भरेल एवढे तापमान नोंदवले जात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कमाल तापमानाचा धारा ३८-४० अंशांदरम्यान आहे. दरम्यान भारतीय हवामान केंद्रान गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचे इशारे दिले आहेत. ३१ मार्चला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

अवकाळी पाऊस कशामुळे येतोय ? हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छतीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांवर आहे. या चक्रीवाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्याची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहे. परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ३१ मार्चला 'येलो अलर्ट'

पावसाबाबतचा अंदाज

* १ एमिल ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली,सातारा, पुणे, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्याना 'येलो अलर्ट', पालघर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, धुळे, जिल्ह्यांना पावसाचा इशारा.

२ एप्रिल- सपूर्ण महाराष्ट्राला पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात 'यलो' अलर्ट. याबाबत पुणे आयएनडी वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यानी 'एक्स'वर पोस्टही केली आहे.

Comments
Add Comment