Monday, May 5, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Fangal Cyclone: फेंगल चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता

Fangal Cyclone: फेंगल चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता

चेन्नई: तामिळनाडूला धडकणारे फेंगल चक्रीवादळ आगामी 24 तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवली आहे. उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारी भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागांत संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ 'फेंगल' तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांकडे येत आहे. त्यामुळे तामिळनाडून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार आणि व्यापक पावसाचा अंदाज आयएमडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. फेंगल चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र होण्याचा अंदाज आहे. "ते उत्तर-वायव्य दिशेने सरकत असून शनिवारी 30 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादाळामुळे, तामिळनाडूच्या बहुतेक भागांमध्ये पुढील 2-3 दिवसांत मोठ्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील, असे पुद्दुचेरी सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची तीव्रता वाढत असल्याने भारतीय नौदलाने सर्वसमावेशक आपत्ती प्रतिसाद योजना सक्रिय केली आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्लाही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment