Monday, June 30, 2025

Sai : सईच्या ‘गुलकंद’ सिनेमाने ३ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी…

Sai : सईच्या ‘गुलकंद’ सिनेमाने ३ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी…
मुंबई: प्रेमाला वय नसत.प्रेम हे कुठल्याही वयात होऊ शकतं..अशाच प्रेमाची मजेदार गोष्ट सांगायला सई ताम्हणकर,समीर चौघुले, प्रसाद ओक आणि ईशा डे
असे हसवणारे कलाकार ‘गुलकंद’ चित्रपट घेऊन आले आहेत, नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झालेला ‘गुलकंद’ सिनेमात प्रेक्षकांना दोन कुटुंबीयांची कथा पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून बॅक टू बॅक अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे ‘गुलकंद’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार, तगडी कलाकार असल्याने या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.



इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, गुलकंद सिनेमाने पहिल्या दिवशी ५५ लाख रुपये कमावले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या सिनेमाने २५ लाखांचा गल्ला जमावला. यानंतर शनिवारी पुन्हा एकदा या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये चांगली वाढ झाली. तिसऱ्या दिवशी ( शनिवार ३ मे ) या ‘गुलकंद’ने ४२ लाखांची कमाई केली. यामुळे ‘गुलकंद’चं कलेक्शन अवघ्या तीन दिवसांत वर्ल्डवाइड १.३७ कोटी इतकं झालं आहे. गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या तुलनेत ‘गुलकंद’ने दणक्यात सुरुवात केली आहे. आता येत्या काळात या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या या सिनेमाचे बरेच शो हाऊसफुल्ल आहेत.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >