Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणबारसू पेटले! पण माथी कोण भडकवतंय?

बारसू पेटले! पण माथी कोण भडकवतंय?

शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन

राजापूर : बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवले. आता या ग्रामस्थांची माथी कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्याच्या उद्योगधंद्याच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे, असे राज्याचे उद्योग व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

रिफायनरी प्रकल्पाला नाणारऐवजी बारसू येथील जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ ला केंद्राला पत्र लिहून सुचवली होती. ते पत्र लिहिण्याआधी त्यांनी स्थानिकांचा विचार करायला हवा होता. त्यावेळी ग्रामस्थांना विचारून पत्र देणे गरजेचे होते. पण तेव्हा कणताही विचार केला नाही. त्या पत्रानुसारच आता सर्वेक्षण सुरू झाले तर आंदोलनकर्त्यांच्या बाजूने आपण आहोत हे दाखवण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतायेत, असा आरोप मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

हे पण वाचा : बारसूमधील आंदोलकांना पोलिसांनी अडवले

मंत्री उदय सामंत म्हणाले की, प्रशासनाचे अधिकारी लोकांशी चर्चा करायला तयार आहेत. चर्चा सुरूही आहेत. गवताला आंदोलनकर्त्यांनी आग लावली तो वणवा पोलिसांनी विझवला. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केलेला नाही. प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण सुरू आहे. अद्याप प्रकल्प करायचा की नाही हे ठरले नाही. कुठेही पोलीस कारवाईचा बडगा करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. काम करणारी माणसेच आहेत. चर्चेला वाव आहे. माती सर्वेक्षण झाल्यानंतरच प्रकल्प तिथे येणार की नाही हे कळेल, असे त्यांनी सांगितले.

तसेच माथी कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्याच्या उद्योगधंद्यादृष्टीने हे चिंताजनक आहे. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, लोकांच्या मनातील सर्व शंका दूर करण्यास सरकार तयार आहे. लोकांना जे आवश्यक आहे ते करायला तयार आहे. माती परिक्षण झाले म्हणजे प्रकल्प होणार असे नाही. अद्याप पुरेसा वेळ आहे लोकांची चर्चा सुरू आहे. आम्हीदेखील तिथे जाऊ शकलो असतो परंतु राजकीय वातावरणामुळे तणाव आणखी बिघडणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. लोकांच्या मनातील संशय दूर झाल्याशिवाय सरकार प्रकल्प पुढे रेटून नेणार नाही, असेही आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरीविरोधात मोर्चा काढण्याची तयारी ठाकरे गटाकडून केली जात होती. मात्र तत्पूर्वी खासदार विनायक राऊत यांच्यासह ७ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारसूनजीक रानतळे येथे ही कारवाई करण्यात आली. बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी भू सर्वेक्षण सुरू आहे. या प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध केला आहे.

संबंधित बातम्या…

अश्रूधूर नव्हे आंदोलकांनी वणवा लावल्याचा उदय सामंत यांचा दावा

सर्व शंकांचे निरसन करूनच ‘बारसू’ प्रकल्प पुढे नेणार

ज्यांच्याकडे नाव नाही, पक्ष नाही, चिन्ह नाही, ते आंदोलकांच्या पाठीशी कोणता पक्ष उभा करणार?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -