Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीAlia Bhatt : आलिया भट दिसणार बायोपिकमध्ये; साकारणार 'ही' भूमिका

Alia Bhatt : आलिया भट दिसणार बायोपिकमध्ये; साकारणार ‘ही’ भूमिका

सध्या कोणत्या चित्रपटाचं शूटिंग सुरु?

मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आलिया भट (Alia Bhatt) हे नाव कायमच चर्चेत असतं. आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi), ‘राझी’ (Raazi), ‘रॉकी और रानी की प्रेमकहाणी’ (Rocky aur Rani ki Premkahani) अशा अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. यातील आलियाचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. गंगूबाईच्या भूमिकेसाठी तर आलियाने राष्ट्रीय पुरस्कार (National award) देखील मिळवला आहे. सध्या आलिया नेमक्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहे, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यासंदर्भात आता एक अपडेट समोर आली आहे.

आलिया लवकरच एका बायोपिकच्या (Biopic) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेनिर्माते, दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या आगामी सिनेमात आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा म्हणजे एक बायोपिक असून एका वृत्तनिवेदिकेच्या आयुष्यावर आधारलेला असणार आहे. सध्या हंसल मेहता आणि आलिया यांच्यात या सिनेमाबद्दल चर्चा सुरू असून ते लवकरच या सिनेमाच्या तयारीला सुरुवात करणार आहेत. २०२४ च्या मध्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या कोणत्या चित्रपटाचं शूटिंग सुरु?

आलिया भट्ट सध्या वासन बाला दिग्दर्शित ‘जिगरा’ या सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्यानंतर ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ‘बैजू बावरा’ या सिनेमात आलिया भट्टसह रणवीर सिंह (Ranveer Singh) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे हंसल मेहता सध्या त्यांच्या आगामी ‘गांधी’ या वेबसीरिजच्या प्री प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहेत. प्रतीक गांधी अभिनीत या सीरिजच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -