Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीAir India: एअर इंडिया एक्सप्रेसची नवी मोहिम; मतदान करणाऱ्यांसाठी खुशखबर!

Air India: एअर इंडिया एक्सप्रेसची नवी मोहिम; मतदान करणाऱ्यांसाठी खुशखबर!

विमान तिकिटावर मिळणार विशेष सवलत

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आजपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया एक्सप्रेसने मतदानाचा प्रचार करण्यासाठी नवीन मोहिम सुरु केली आहे. एअरलाइनकडून प्रथमच मतदारांसाठी तिकिटांवर विशेष सवलत मिळणार आहे. जे लोक पहिल्यांदा मतदान करण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत त्यांना विमान तिकिटावर १९ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

लोकांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने #VoteAsYouAre मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत, एअरलाइन्स प्रथमच मताधिकाराचा वापर करणाऱ्या १८ ते २२ वर्षे वयोगटातील तरुणांना विशेष सवलत देत आहे. मतदाराला संबंधित मतदारसंघाच्या जवळच्या विमानतळावर जाण्यासाठी ही सूट मिळेल. १८ एप्रिल ते १ जून २०२४ या कालावधीत ही सूट उपलब्ध असेल. सवलतीच्या तिकिटांचे बुकिंग एअरलाइनचे मोबाइल ॲप आणि वेबसाइट https://www.airindiaexpress.com द्वारे केले जाऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ अंकुर गर्ग म्हणतात की, एअर इंडिया एक्सप्रेसने नेहमीच समाजातील बदलासाठी काम केले आहे. कंपनी १९ व्या वर्धापन दिनाच्या तयारीत आहे. अशा वातावरणात कंपनीने आपला खास उपक्रम सुरू केला आहे.

ऑफरसाठी मतदार ओळखपत्र दाखवणे

एअर इंडिया एक्सप्रेसच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राउंड स्टाफला तुमचे मतदार ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. विमानतळावर बोर्डिंग पास घेताना ग्राहकांना त्यांचे मतदार ओळखपत्र दाखवावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -