Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमीApple,Wikipedia नंतर रशियाच्या निशाण्यावर आता Google

Apple,Wikipedia नंतर रशियाच्या निशाण्यावर आता Google

मॉस्को: युक्रेनसोबत (ukraine) सुरू असलेल्या लढाईत रशियन सरकार (russian government) कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाही. रशियाच्या एका न्यायालयाने अॅप्प(apple) आणि विकीपिडियानंतर (wikipedia) आता गुगलवर (google) आपला निशाणा साधला आहे. एका दंडाधिकारी न्यायालयाने युक्रेन युद्धाशी संबंधित व्हिडिओ यूट्यूबवरून हटवल्याप्रकरणी गुगलवर ३२ हजार डॉलरचा दंड ठोठावसा आहे. रशियाच्या न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात विकीपिडीया आणि अॅप्पलविरुद्ध याच पद्धतीचे पाऊल उचलले होते. दोघांवर दंड ठोठावला होता.

असोसिएट प्रेसच्या बातमीनुसार रशियाच्या न्यायालयाने युक्रेनमधील संघर्षाबाबतची चुकीची माहिती हटवण्यास अयशस्वी ठरल्याबद्दल गुगलवर गुरूवारी ३२ हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुगलचे स्वामित्व असलेल्या यूट्यूबने या युद्दधाबाबत चुकीची माहिती देणारे व्हिडिओ हटवले नसल्याचे न्यायालयाला आढळले.

तसेच जे अल्पवयीनांसाठी फायदेशीर नाहीत असेही व्हिडिओ गुगलने हटवले नसल्याने त्यातही गुगल दोषी आढळला आहे. याआधी रशियाच्या न्यायालयाने रशियन सैन्य कारवाईंबाबतची खोटी माहिती दिला जाणारा कंटेट हटवण्यात अयशस्वी ठरलेल्या अॅप्पल आणि विकीपिडियावरही या ऑगस्टच्या सुरूवातीला दंड ठोठावला होता.

युक्रेनसोबतच्या युद्धाचे रशियावर काही चांगले परिणाम होत नाही आहेत. एकीकडे पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत तर देशांतर्गत रशियाच्या या अभियानाविरुद्ध आवाज उठवले जात आहे. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारला याच्याशी काहीही घेणेदेणे नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -