Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIPL 2024लखनऊचा थरारक विजय

लखनऊचा थरारक विजय

कोलकाताला नमवत ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश

ईडन गार्डन्स (वृत्तसंस्था) : निकोलस पुरनचा अर्धशतकीय झंझावात आणि रवि बिष्णोईची दमदार गोलंदाजी या बळावर लखनऊने कोलकातावर एका धावेने थरारक विजय मिळवला. या विजयामुळे लखनऊने अंतिम चार संघांमध्ये प्रवेश मिळवला आहे.

प्रत्युत्तरार्थ जेसन रॉय आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली. जेसन रॉयने ४५ धावा तडकावल्या. व्यंकटेश अय्यरने २४ धावा फटकवल्या. त्यानंतर रिंकू सिंहने एकहाती फटकेबाजी करत सामना थरारक स्थितीत आणला. त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. शेवटच्या चेंडूवर रिंकूने षटकार लगावला. परंतु अवघ्या एका धावेने कोलकाताने हा सामना गमावला. रिंकूने नाबाद ६७ धावा फटकवल्या. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. कोलकाताने निर्धारित २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात १७५ धावांपर्यंत मजल मारली. लखनऊच्या रवि बिष्णोई आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.

निकोलस पूरनच्या ५८ धावांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर लखनऊने निर्धारित २० षटकांत आठ विकेटच्या मोबदल्यात १७६ धावांपर्यंत मजल मारली. क्विंटॉन डी कॉक (२८ धावा), प्रेरक मंकड (२६ धावा) आणि आयुष बदोनी (२५ धावा) यांनी साथ दिल्याने लखनऊने सन्मानजनक धावसंख्या उभारली. प्रथम फलंदाजी करताना लखनऊची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज करण शर्मा तीन धावांवर तंबूत परतला. त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि प्रेरक मंकड यांनी कोलकात्याच्या डावाला आकार दिला. दोघांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या पुढे नेली. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने २५ चेंडूंत ४१ धावांची भागिदारी केली. प्रेरक मांकडने २० चेंडूंत २६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले. प्रेरक मंकड बाद झाल्यानंतर स्टॉयनिसही तंबूत परतला. स्टॉयनिसला खातेही उघडता आले नाही. वैभव अरोराने या दोघांना लागोपाठ तंबूत पाठवले. निकोलस पुरनने वादळी खेळी खेळत लखनऊची धावसंख्या पुढे नेली. त्याने ३० चेंडूंत ५८ धावा फटकवल्या. त्याला आयुष बदोनीच्या २५ धावांची साथ मिळाली. कोलकाताच्या वैभव अरोरा, शार्दुल ठाकूर आणि सुनिल नरिन यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -